लातूर : प्रतिनिधी
देशात हार्वेस्टर तोडणी यंत्राचा वापर करुन उस तोडणी करुन वेगळा पॅटर्न राबवणारा लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास पश्चीम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत येथील श्रीपती शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी यांनी मंगळवारी कारखाना स्थळी भेट देऊन हार्वेस्टर व प्रशासकीय यंत्रणेची पाहणी केली समाधान व्यक्त्त केले. तत्पूर्वी कारखाना स्थळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, श्रीपती शुगर्सचे अध्यक्ष महेंद्रअप्पा लाड उपस्थित होते.
यावेळी कारखाना स्थळी जत बाजार समितीचे संचालक शशिकांत पवार, पतंगराव कदम सोसायटीचे संचालक विक्रम लाड, जत सोसायटीचे चेअरमन अशोक लाड, उपाध्यक्ष सतीश पवार, संचालक सचिन सावंत, आज्ञान पांढरे, पोपट लाड, जनरल मॅनेजर महेश जोशी, चिप इंजिनियर यशवंत जाधव, तसेच मांजरा साखर कारखान्याचे संचालक मंडळ, विविध खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मांजरा कारखान्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्रीपती शुगर्स काम करेल
राज्यात नावलौकिक असलेल्या सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दैदीप्यमान वाटचाल करीत असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्यास भेट देऊन हार्वेस्टरद्वारें उस तोडणी व प्रशासकीय कामकाजाची पाहणी केली. अतिशय सुंदर नियोजन करुन उस उत्पादक शेतक-यांना कमी कालावधीत हरवेस्टरद्वारें उसाची तोडणी व प्रशासकीय कामाची पाहणी केली. त्यावेळीं ते बोलत होते. यापुढे आम्हाला मांजराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न करु, असे सांगून मांजरा साखर परिसर व येथे असलेले लोकनेते विलासराव देशमुख यांचे स्मृती स्थळ व परिसर सुशोभित करुन एक चांगला साखर कारखाना म्हणून राज्यात मांजरा साखर कारखान्याचा नावलौकिक मिळवला आहे पुढेही राहील असा विश्वास श्रीपती शुगर्सचे अध्यक्ष महेंद्रअप्पा लाड यांनी यावेळी बोलून दाखवला.