24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरमागणी घटल्याने बाजार समितीत डाळिंबाच्या दरात घसरण

मागणी घटल्याने बाजार समितीत डाळिंबाच्या दरात घसरण

सोलापूर -डाळिंबाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या गुजरातच्या डाळिंबाची आवक होत आहे. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह गुजरात आंध्र प्रदेश कर्नाटक इत्यादी राज्यातून डाळिंबाची आवक सुरू झालेली आहे.

मात्र, थंडीमुळे ग्राहकांमध्ये डाळिंबाची मागणी कमी झालेली दिसून येत आहे. मागणी घसरल्यामुळे डाळिंबाचे दर प्रति किलोमागे ४० रू. इतके दर कमी झाले आहेत. दरम्यान सोलापूर बाजार समितीत डाळिंबाची सुमारे ७० टन इतकी आवक झाली होती. दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी डाळिंबाची खरेदी कमी प्रमाणात केल्यामुळे डाळिंबाचे दर कमी झालेले दिसत आहेत.

प्रति किलो ३०० रुपयांवर गेलेले डाळिंबाचे दर सध्या १५० रुपयांवर आले होते. त्यानंतर आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक राज्यातून डाळिंबाची आवक सुरू झालेली आहे.त्यामुळे डाळिंबाच्या दरात दुसऱ्यांदा किलोमागे ४० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या बाजार समितीत डाळिंबाचे दर प्रति किलोसाठी १०० रुपयापर्यंत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी डाळिंबाचे दर वाढले होते. वाढीव दरामुळे चार पैसे हातात मिळतील अशी आशा होती. परंतु बाजारपेठेत डाळिंब विक्रीसाठी आणला असता डाळिंबाचे दर घसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे खर्च वजा जाता उत्पन्न कमी प्रमाणात मिळाले आहे.काही दिवसांपूर्वी डाळिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे डाळिंबाचे दर सुमारे तीनशे रुपये किलो पर्यंत पोहोचले होते. यामध्ये भगवा डाळिंबाच्या प्रजातीला सर्वाधिक मागणी होती. परंतु सध्या थंडी वाढल्याने डाळिंबाची मागणी घटली आहे. त्यामुळे दरात देखील घसरण निर्माण झालेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR