28 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeलातूरमाजी पंतप्रधान राजीव गांधींच्या स्मृतीदिनानिमित्त मांजरा परिवारातर्फे अभिवादन 

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या स्मृतीदिनानिमित्त मांजरा परिवारातर्फे अभिवादन 

लातूर : प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. २१ मे रोजी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी स्व. राजीव गांधी यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मंत्री तथा मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राजीव गांधींच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रवीण पाटील, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, सचिन दाताळ, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी यांच्यासह मांजरा साखर परिवारातील कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR