22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते  मार्केट यार्डातील श्री गणेशाची आरती

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते  मार्केट यार्डातील श्री गणेशाची आरती

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. १४  सप्टेंबर रोजी दुपारी लातूर शहरातील शिवछत्रपती मार्केट यार्डातील  श्री सार्वजनिक गणेश मंडळाच्या ‘श्री’ गणेशाची आरती करण्यात आली.
यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती जगदीश बावणे, सचिव अरविंद पाटील, श्री सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत खंदाडे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, अशोक(गट्टूशेठ) अग्रवाल,आत असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत पाटील, गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळशीराम गंभीरे, कामगार मंडळ अध्यक्ष बालाजी जाधव, सुरेश धानूरे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्वश्री बालाप्रसाद बिदादा,सुधीर गोजमगुंडे सुभाष घोडके, बळवंत पाटील आनंद पाटील, श्रीनिवास शेळके, आनंद मालू, सुरेश धानुरे अनंत पाटील, अनंत पवार, शिवाजी देशमुख, बालाजी वाघमारे, युवराज जाधव, लक्ष्मण पाटील, तुकाराम गोडसे, रमेश सूर्यवंशी, बालाजी बेजगमवार आदीसह हमाल मापाडी गुमास्ता आडते शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR