18.1 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली नालंदा बुद्ध विहाराला भेट 

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिली नालंदा बुद्ध विहाराला भेट 

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी   दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी लातूर शहरातील प्रकाशनगर येथील नालंदा बौद्ध विहाराला सदिच्छा भेट देऊन भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. तसेच उपस्थितांसोबत बुद्ध वंदना केली. यानंतर दुपारी अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे जाऊन हजरत सय्यद सादिकअली शाह दरगाह येथे चादर अर्पण करुन दर्शन घेतले. हजरत अख्तरअली शहा यांचे आशीर्वाद घेतले.
लातूर येथील नालंदा बौद्ध विहाराला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, भन्ते पय्यानंद महाथेरो, भन्ते बोधिराज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सुरेश गायकवाड, नालंदा बौद्ध विहार कमिटिचे अध्यक्ष उत्तम कांबळे, प्रज्ञा महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला सुरवसे,  सोनकांबळे, आपटे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, विजय गायकवाड, आयुब मणियार, दत्ता सोमवंशी, पप्पू देशमुख, नागसेन कामेगावकर, योजना कामेगावकर, राजा माने, यशपाल कांबळे, सुनील कांबळे, राजू गवळी, धोंडीराम यादव, संजय ओहळ, पत्रकार अशोक देडे, हरिभाऊ गायकवाड सुरवसे, प्रवीण सूर्यवंशी, कांबळे, धसवाडिकर प्रा. प्रवीण कांबळे, मकबूल वलांडीकर, राहुल डूमणे, भाऊसाहेब भडीकर, रत्नदीप अजनीकर, मोहन सुरवसे, इमरान सय्यद, सुमित खंडागळे, विजय टाकेकर, किरण बनसोडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
यानंतर दुपारी सायगाव येथे हजरत सय्यद सादिकअली शाह दरगाह येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी सय्यद अख्तरअली, शाह हुसैनी, दरबारे मुरशिदी, मोईज शेख, शकील इनामदार, ताजखान पठाण, रफिक पटेल, अरफात खान, परवेज हाश्मी, पाशाभाई गुत्तेदार, सय्यद नयूम, सय्यद असदुल्ला, मुक्त्तारखा पठाण, चांदपाशा इनामदार, अ‍ॅड. फारुख शेख, युनूस मोमीन, अहेमदखा पठाण, सत्तार शेख, इम्रान सय्यद, मकबूल वलांडीकर, तबरेज तांबोळी,  हरिभाऊ गायकवाड, राम स्वामी, कलीम शेख आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR