लातूर : प्रतिनिधी
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका-२०२४ चे प्रकाशन बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकरी तसेच कृषी उद्योगाशी निगडित व्यापारी व इतर सर्व घटक या सर्वांना ही दिनदर्शिका उपयुक्त्त ठरेल, असा विश्वास यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त्त केला. यावेळी बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, संचालक आनंद पाटील, श्रीनिवास शेळके, लक्ष्मण पाटील, युवराज जाधव, पवन देशमुख, बळवंतराव पाटील,अनिल पाटील, बालाजी वाघमारे, बालासाहेब बिदादा, सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे, आनंद मालू यांच्यासह लातुर कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य उपस्थित होते.