24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा लातूरकरांकडून होणार नागरी सत्कार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा लातूरकरांकडून होणार नागरी सत्कार

लातूर : प्रतिनिधी
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टिक असोसिएशन इंडिया पुणे या  संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अतिशय प्रतिष्ठित मानाचा  २०२४ चा साखर उद्योग गौरव पुरस्कार लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा मांजरा साखर परिवारातील संस्थांचे  मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांना पुणे येथील शानदार सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला. त्यामुळे लातूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याबद्दल मंगळवारी लातूर शहरातील विविध सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक, यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी सत्कार करण्यासाठीं शहरातील विविध संस्था पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक डॉक्टर वकील, इंजिनियर विचारवंत पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठीं उपस्थिती होती. त्यामुळे आशियाना निवासस्थान गर्दीने खचाखच भरुन गेलेले दिसत होते. दरम्यान माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा लातूरकरांकडून नागरी सकार करण्याचे नियोजन असून त्यास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी होकारही दिला आहे.
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट इंडिया पुणे या संस्थेने देशभरातील साखर इंडस्ट्रीजमध्ये उत्कृष्ठ कार्य करणारे कारखान्याचे  मार्गदर्शक, चेअरमन संस्थापक अशा नामवंत व्यक्त्तींना हा पुरस्कार दिला जातो. त्यात  राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार मिळाला आहे. साखर इंडस्ट्रीजमध्ये अतिशय सूक्ष्म नियोजन करुन उत्तम प्रशासन, पारदर्शकता एफ. आर. पी. सहीत शेतक-यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न करुन जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडवून आणण्याचे काम या  मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखान्याने केलेले आहे. मांजरा साखर परिवारातील सर्व साखर कारखाने राज्यात नावलौकिक मिळवलेले आहेत. हा मानाचा पुरस्कार आपल्या लातूरच्या शिरपेचात आणखी तुरा माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांच्यामुळे  रोवला गेला आहे.
लातूर शहरातील सर्व क्षेत्रातील कार्य करणा-या सर्व संवेदशील लातूरकरांनी एकत्रित येऊन नागरी सत्कार कमिटी केलेली असून या कमिटीच्या वतीने लवकरच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून यासाठी एक स्वतंत्र नागरी सत्कार समिती नेमण्यात आली आहे. त्या कमिटीच्या वतीने मंगळवारी आशियाना बंगल्यावर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा शाल श्रीफळ व संत तुकारामांची गाथा देवुन  कमिटीचे सदस्य खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी ,सुपर्ण जगताप, शिवाजी कांबळे, अ‍ॅड. कालिदास देशपांडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ उमेश कानडे, अ‍ॅड. उदय गवारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सुरेश वाघमारे, डॉ अशोक पोतदार, डॉ. सतीश बिराजदार, सुनिल कोचेटा, जयप्रकाश दगडे, पापासेठ ताथोडे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, डॉ. कल्याण बरमदे, रमेश बियाणी, धनराज बरुरे, अभय शहा, सत्तार पटेल, जकी कायमखानी, अ‍ॅड. योगेश जगताप, डॉ. रमेश भराटे, डॉ. दीपक गुगळे, डॉ. आनंद पाटील, अमृत सोनवणे, डॉ. गिरीश कोरे, डॉ. राहुल सुळ, डॉ. अजय जाधव, शशिकांत पाटील, डॉ. संजय वारद, डॉ. संजय पौल पाटील, राजेश दराडे, शरद देशमुख, डॉ. राजकुमार दाताळ, प्रा. माधव गादेकर, चंद्रकांत साळुंखे, प्रमोद सुपर मार्केटचे भूषन दाते, विक्रम ब्रिजबासी, चंद्रकांत साळुंखे, संजय सावंत, रामभाऊ चलवाड, रामदास पवार, सतीश पाटील वडगावकर, राहूल लोंढे बाळकृष्ण धायगुडे  आदि उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR