माझ्याविरोधातील गुन्हा खोटा; रुपाली ठोंबरे आक्रमक

बीड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्वीट केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट करत रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली. पण यावर प्रतिक्रिया देताना रुपाली ठोंबरे यांनी ‘माझ्याविरोधात बीडमध्ये दाखल केलेला गुन्हा खोटा आहे.’, असा आरोप केला. तसेच मी कोणालाही घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना, रुपाली ठोंबरे यांनी सांगितले की, माझ्या विरोधात बीडमध्ये दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. एफआयआरमध्ये ज्यांच्याबद्दल बदनाम झालं असं म्हणतात त्यांचं नावच नाही. जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पण मी घाबरणार नाही. मी स्वत: बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेले चॅट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले होते. यावरून सध्या जितेंद्र आव्हाड आणि रूपाली ठोंबरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या पोस्टनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीनंतर रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत ‘कर नाही तर डर कशाला?’ असे म्हणत पोस्ट शेअर केली. त्यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, माझे खोटे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल करणा-यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news