27.6 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्या नावाचा दुरुपयोग, अण्णांचा खुलासा

माझ्या नावाचा दुरुपयोग, अण्णांचा खुलासा

अहमदनगर : प्रतिनिधी
शिखर बँक घोटाळा प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत याचिका दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अण्णांनीच या वृत्तावर आक्षेप घेतला. या प्रकरणी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याचे वृत्त माध्यमांत आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच अजित पवारांना लक्ष्य केले जात असल्याचे काहींनी म्हटले होते. यावर अण्णा हजारे यांनी गौप्यस्फोट करीत मी कुठलीही याचिका दाखल केली नसल्याचे म्हटले. या संदर्भात माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचे अण्णा म्हणाले. ते राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलत होते.

मी कधी बोलत नाही, बोललो नाही. मात्र माझे नाव आले. मला धक्का बसला, असे अण्णा म्हणाले. तसेच १५ वर्षांपूर्वी मी आवाज उठवला होता. पण आता या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही. अजित पवारांना दिलेल्या क्लीनचीट संदर्भात ज्यांना माहिती आहे, ते बोलतील, माझा याच्याशी कुठलाही संबंध नाही, असे स्पष्ट शब्दात अण्णा हजारे यांनी सांगितले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR