18.2 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमाणसाप्रमाणे विचार करणारे एआय विकसित

माणसाप्रमाणे विचार करणारे एआय विकसित

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
पेन एआयने एक नवीन एआय मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडेल त्यांच्या ‘प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी’ या प्रकल्पाचा एक भाग आहे. नवीन ओपन एआय ०१ हे पहिले असे मॉडेल आहे जे विज्ञान कोडिंग आणि गणितातील अवघडातून अवघड समस्या सोडविण्यासाठी तयार करण्यात आले आहे. नवीन मॉडेल उत्तर देण्यापूर्वी प्रश्नांचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्यासाठी डिझाइन केले आहे. एखाद्या कठीण समस्येचे निराकरण करताना माणूस जसा विचार करतो, तसेच हे मॉडेलदेखील विचार करू शकणार आहे.

वेगवेगळ््या दृष्टिकोनातून समस्यांना कसे पाहायचे, त्याचा निष्कर्ष कसा तपासायचा आदी सर्व बाबींचा हे मॉडेल विचार करू शकणार आहे. हे मॉडेल माणसाप्रमाणेच चुकांमधून शिकते आणि आणखी सक्षम होत जाते. त्यांच्या चाचण्यांवर आधारित ओपन एआयने सांगितले की, याच मालिकेतील पुढील मॉडेल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये तसेच पीएचडी विद्यार्थ्यांना मदत करू शकेल आणि गणित व कोडिंगसाठी अत्यंत प्रभावी ठरेल.

नवीन ओपन एआय ०१ हे पहिले असे मॉडेल आहे, जे विज्ञान, कोडिंग आणि गणितातील अवघडातून अवघड समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. परंतु ०१ मॉडेल ही प्रारंभिक आवृत्ती आहे आणि अद्याप यात वेब ब्राउझ करणे किंवा फाइल्स आणि छायाचित्र व्यवस्थापित करणे यांसारखी वैशिष्ट्ये नाहीत. हे मॉडेल अधिकाधिक अवघड समस्या सोडवण्यासाठी योग्य आहे. ही एआय तंत्रज्ञानातील एक मोठी झेप असल्याचे सांगितले जात आहे.

कठीण कोडिंग करण्यास सक्षम
०१ अतिशय कठीण कोडिंग करण्यास सक्षम आहे. नवीन मॉडेल कठीणातील कठीण समस्यांचे निराकरण करू शकत असल्याने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा विश्लेषण, कोडिंग, गणितीय मॉडल्स यांसारख्या कार्यांचा समावेश असलेल्या नोक-यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. विचार करणे किंवा समस्येवर मार्ग काढणे हे एक बौद्धिक कार्य आहे आणि ते स्वयंचलित केल्यास माणसाच्या सहभागाची गरज कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम नोकरीवर होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR