‘मातोश्री’ परिसरात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत शिवसेनेत पुन्हा बॅनरवॉर सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात बॅनरबाजी वांद्रे भागात सुरू झाली आहे. वांद्रे येथील ‘मातोश्री’समोरच शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी’, असे बॅनर लावण्यात आले. बॅनरवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना शिवबंधन बांधतानाचा फोटोसुद्धा वापरला आहे. तसेच या बॅनरवर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. तसेच बघताय काय? सामील व्हा, असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असतानाचा फोटो वापरला आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. तसेच या बॅनरवर क्यूआर कोड दिला आहे. एक मोबाईल क्रमांक दिला आहे. त्यामाध्यमातून शिवसेना सदस्य होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिवसेना उबाठाकडून विकास कामांचे बॅनर
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बॅनरला उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यात वांद्रे येथील पाणी पुरवठ्याचा विषय मांडला होता. वांद्रे पूर्वला मिळणार ५ एमएलडी अतिरिक्त पाणी, या अशा आशयाची बॅनरबाजी शिवसेना ठाकरे पक्षाकडून लावण्यात आली आहे. यामुळे वांद्रे येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमने-सामने येतात का? असा प्रश्न विचारला जात आहे. विकास कामांवरून आणि सदस्य नोंदणीवरून दोन्ही पक्षांकडून जोरदार बॅनरबाजी केली गेली आहे.

मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट वर्चस्वाची लढाई करत आहे. मुंबई कोणाची? हे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. ही निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी दोन्ही शिवसेनेकडून मुंबई मनपा निवडणुकीची तयारी सुरू केली जात आहे. त्यामुळे मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न शिवसेना उबाठा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news