पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ होत चालले आहे. वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले असून खराब हवेमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सुधारणांद्वारे तयार केलेला पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजे दंतहीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. दरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) ऐश्वर्या भाटी यांनी केंद्र सरकारच्या वतीने १० दिवसांत नियम अंतिम केले जातील आणि कायदा कार्यान्वित केला जाईल, असे म्हटले आहे.

न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओका यांच्या खंडपीठाने पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई न केल्याबद्दल पंजाब सरकारला फटकारले. पंजाबमधील ज्या अधिका-यांनी कारवाई केली नाही त्यांच्यावर खटला चालवा. तीन वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांचे सचिव (पर्यावरण) आणि अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचे एएसजीने न्यायालयाला सांगितले. १० दिवसात कलम १५ पूर्णपणे कार्यान्वित होईल, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले. यावर न्यायालयाने नियम तुम्हाला खटला चालवण्याची परवानगी देतात. तुम्ही त्यांच्यावर खटला चालवा अन्यथा काहीही होणार नाही, असे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने कलम २१ नुसार जगण्याचा अधिकार, शुद्ध हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. अशा स्थितीत सरकारांचे अपयश म्हणजे नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन आहे. राज्यांनी दिलेल्या प्रस्तावावर दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा आणि भरपाईची रक्कम वाढवण्याबाबतच्या नियमात बदल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. आम्ही स्पष्ट करतो की, जर परिस्थिती सुधारली नाही आणि असेच चालू राहिले तर आम्ही कठोर आदेश जारी करू. राज्ये आणि आयोग यांच्यातील समन्वयही महत्त्वाचा आहे, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले.

दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब
राष्ट्रीय राजधानीत आज प्रचंड धुके जमा झाले होते. तिथे हवेची गुणवत्ता ३६३ एक्यूआयसह ‘अत्यंत खराब’ श्रेणीत राहिली तर आणखी काही भाग गंभीर झोनमध्ये आले. जवळजवळ सर्व हवामान निरीक्षण केंद्रे रेड झोनमध्ये होती. जहांगीरपुरी मॉनिटरिंग स्टेशनने ४१८ वर गंभीर वायू गुणवत्ता निर्देशांक नोंदवला तर विवेक विहारचे वाचन ४०७ आणि आनंद विहारचे ४०२ होते.

२ दिवसांत दिल्लीत प्रदूषण ५ पट वाढले
एअर क्वॉलिटी अर्ली वॉर्निंग प्रोटेक्शन यंत्रणेच्या अहवालातून पुढील २ दिवसांत दिल्लीतील हवेचे प्रदूषण ५ पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी कार्बन मोनोऑक्साईडची पातळी ७ पटीपर्यंत जाऊ शकते. अशी परिस्थिती उद्भवल्यास श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतील. तसेच अनेक रुग्णशय्येवर असलेल्या रुग्णांसाठीही ही धोक्याची घंटा आहे. याच कारणामुळे पंजाब, हरियाणामध्येही वायू प्रदूषण वाढले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BREAKING: नांदेडमध्ये काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
01:48
Video thumbnail
BIG BREAKING:बार्शी रोडवरील ९७ पथदिवे २० वर्षांपासून बंद; ड्रीम प्रोजेक्ट दुर्लक्षित
02:52
Video thumbnail
BIG BREAKING : मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात;आरोपीकडून ६ दुचाकी जप्त
01:01
Video thumbnail
LIVE : 'हिशोब चुकता होईल' या दानवेंच्या टीकेवर ओमराजेंची भूमिका काय?
07:08
Video thumbnail
LIVE : 'हिशोब चुकता होईल' या दानवेंच्या टीकेवर ओमराजेंची भूमिका काय?
00:00
Video thumbnail
LIVE-महाराष्ट्र विधानसभा कामकाज 2026
03:29:40
Video thumbnail
BIG BREAKING: खासदारांचा ताफा अडवण्याचा ठाकरे सेनेचा प्रयत्न; कार्यकर्त्यांचा रस्त्यावर उतरून एल्गार
03:48
Video thumbnail
BIG BREAKING : आजपासून राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात;उन्हाच्या तीव्रतेमुळे शासनाचा निर्णय
01:21
Video thumbnail
जळकोट तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; नद्यांना पूर, तलाव ओसंडले तर शेतीची प्रचंड दाणादाण!
02:21
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरमध्ये उघड्या डीपी आणि जीर्ण खांबांमुळे नागरिक धास्तावले
03:10
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्यापासून सुटका, अनेक गावांची बत्ती गुल
01:25
Video thumbnail
BIG BREAKING : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा १६ जागांवर विजय
02:00
Video thumbnail
Solapur|सोलापुरात कमळ फुललं; राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय!
00:53
Video thumbnail
Lakhnow|लखनऊमधील तीन मजली इमारतीला भीषण आग; १४ जणांचा मृत्यू
01:31
Video thumbnail
Latur|धाराशिव-लातूर-बीड विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय
01:24

Latest news