21.9 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeपरभणीमानवत शहरात एस.टी., खाजगी वाहनांवर दगडफेक

मानवत शहरात एस.टी., खाजगी वाहनांवर दगडफेक

परभणी : परभणी शहरात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाल्यानंतर सोमवार, दि.१६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परभणी शहरासह जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा, गंगाखेड या सर्वच तालुक्याच्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यात मानवत वगळता सर्व ठिकाणी बंद शांततेत पार पडला. मानवत शहरात मात्र बसस्थानकात उभा असलेल्या एका बसवर तसेच कृउबा समिती यार्डातील खाजगी वाहनांवर दगडफेक करण्यासह एक कापसाची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.

मानवत शहरातील बसस्थानकात पाथरी आगाराची मानवत ते रामटाकळी धावणारी मानविकासची बस क्रमांक एम.एच. ०६ एस ८६३९ ही उभा होती. या बसवर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करीत बसच्या काचा फोडल्या. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात कापूस विक्रीसाठी आलेल्या वाहनांवरही दडफेक करण्यात आली. यात ३ वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे काही काळ कापूस लिलाव बंद होता. तसेच संगमेश्वर जिनींग जवळ उभा असलेल्या कापसाच्या वाहनाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू शेतक-याच्या समय सुचकतेमुळे हा प्रकार टळला. सध्या शहरात पोलिस निरीक्षक संदिप बोरकर यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR