30.8 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeलातूरमानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने पिनाटे सन्मानित

मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने पिनाटे सन्मानित

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस विजयकुमार पिनाटे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानव विकास सेवाभावी संस्था, गुरधाळ यांच्यातर्फे मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार-२०२५ पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथ  देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील दयानंद सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार बाबासाहेबजी पाटील हे होते.  प्रमुख सत्कारमूर्ती तथा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.   यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरचे श्रद्धेय रमाकांत व्यास,  खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, सुप्रसिद्ध गायक डॉ. अंबरीश महाराज देगलूरकर, संस्थेचे अध्यक्ष सरोजा वसंत-घोगरे, सचिव वसंत व्यंकटराव  घोगरे यांची उपस्थिती होती.
या पुरस्काराबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राजाध्यक्ष शाम लेडे, राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, कार्याध्यक्ष संतोष डोंगरकोष, कोषाध्यक्ष संजय मांगे, विभागीय अध्यक्ष राजू बोचरे, अरुण मडके, चेतन शिंदे, संदिप तिडके, सुनिल पाटील, राजेंद्र मुंगले, राजेंद्र भोयर, श्याम मुस्के, हिरालाल पाटील, भारत काळे, माधव मठवाड, सुदर्शन बोराडे, दीपक जाधव, रामदास अनंतवार, महादेव गरड, लायक पटेल, प्रा. शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, निलेश राजमाने आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR