33.1 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeलातूरमारवाडी स्मशानभूमीमध्ये मोफत पाणपोयी सुविधा

मारवाडी स्मशानभूमीमध्ये मोफत पाणपोयी सुविधा

लातूर : प्रतिनिधी
अंत्ययात्रेत आलेल्या परिजनांसाठी  श्री मारवाडी सेवाभावी संस्था लातूरच्या वर्धापन दिनानिमित्त श्री मारवाडी सेवाभावी संस्था लातूर व श्री सेवा आधार सेवाभावी संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ फेबु्रवारी रोजी मारवाडी स्मशान भुमीमध्ये मोफत पाणपोईची सुरुवात करण्यात आली.
सदर उपक्रमाचा शुभारंभ लातूर अर्बन को-ऑप बैंक लिमिटेड, लातूरचे प्रबंध निदेशक नवनीत भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. या  प्रसंगी नवनीत भंडारी यांनी सदर संस्थेच्या कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास किशोर लोया, विशाल भोपणीकर, गोपाल झंवर, विजय पोतदार, राजेश डूंगरवाल, मीरा गोरे, सुरेश गिल्डा, नंदकिशोर लोया, राजकुमार खंडेलवाल, ईश्वर बजाज, ईश्वर बाहेती देवीकिशन भुतडा, सुभाष जाधव, गौसभाई शेख, सुरज लोंढे मनोज येडके, शरद येडके, कृष्णा बिडवे, शब्बीर शेख, सतीश दुरुककर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन डॉ. ईश्वरपप्रसाद बिदादा यांनी केले.
फोटो: ८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR