23 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeलातूर‘मास्तर’ हुगेवाड अखेर पोलीसांच्या ‘पिंज-यात’

‘मास्तर’ हुगेवाड अखेर पोलीसांच्या ‘पिंज-यात’

लातूर : प्रतिनिधी
तुळजापूरातील महिलेला लातूरात बोलावून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आल्या प्रकरणी पोलीसांनी तपासाची सुत्रे हलवताच या प्रकरणाचा मास्टर माईंड निलंगा तालुक्यातील एका जिल्हा परीषद शाळेचा मास्तरच आल्याचे समोर आले होते. सदरील मास्तर विठ्ठल रामराव हुगेवाड यास पोलीसांनी शनिवारी अटक केली होती. त्यास रविवारी न्यालयासमोर पोलीसांनी हजर केले असता त्यास तिन दिवसाची पोलीस कोठउी सुनावण्यात आली आहे. इतर तिन आरोपींचा पोलीसांकडून शोध घेतला जात असून लवकरच त्यांचा पर्दाफाश होणार आहे.

तुळजापूर बसस्थानक येथे काही दिवसांपुर्वी येथील एका महिलेची निलंगा तालुक्यात मास्तर असलेल्या विठ्ठल रामराव हुगेवाड याची ओळख झाली होती. यावेळी सदरील पिडीत महिलेने चर्चेदरम्यान मास्तर हुगेवाड याचेकडे माझ्यासाठी काही काम आहे का पहा, असे सांगीतले होते. मास्तर हुगेवाड याने दि. १५ सप्टेंबर रोजी फोन करुन तुमच्यासाठी काम आहे. लातूरला या म्हणून लातूरात दि. १६ सप्टेंबर रोजी बोलावून घेतले व दि. १६ सप्टेंबर रोजी सदरील पिडीत महिला लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचल्यानंतर त्याने संशयीत अगोदरच चालकासह इतर दोघे जण बसलेल्या कारमध्ये सदरील पिडीत महिलेसह स्वता: कारमध्ये बसत कार चालकास कार नांदेड रोडला घेण्यास सांगितले. कार नांदेड रोडवर पोहचताच काही अंतरावर कार रस्त्याच्या कडेला थांबवून चौघा पैकी दोघांनी कारमध्येच झोंबाझोंबी करुन जबरदस्तीने पिडीत महिलेवर बलात्कार केला.

त्यानंतर सदरील पिडीत महिलेला कोळपा परिसरात महामार्गाला लागून असलेल्या मॅजेस्टीक लॉजमध्ये नेऊन तीच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सदरील पिडीत महिलेच्या तक्रारीवरून स्संशयीत शिक्षकासह कारमधील इतर तिघा विरोधात स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पालीसांनी तपासाची सुत्रे गतीमान करताच या प्रकरणाचा मासटर माईंड मास्तर विठ्ठल हुगेवाड यास शनिवारी ताब्यात घेऊन अटक केली होती त्यास रविवार रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलीसांकडून या प्रकरणातील इतर तीन आरोपींचा व गुन्ह्यात वापराण्यात आलेल्या पांढ-या रंगाच्या कारचा शोध घेतला जात असून याचार लवकरच पर्दाफाश होईल असे पोलीसांकडून सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR