22 C
Latur
Friday, February 7, 2025
Homeमुख्य बातम्या‘मिल्की वे’ पेक्षाही ३२ पट मोठ्या आकाशगंगेचा शोध

‘मिल्की वे’ पेक्षाही ३२ पट मोठ्या आकाशगंगेचा शोध

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
खगोलशास्त्रज्ञांनी आता एक अशी वैशिष्ट्यपूर्ण रेडिओ गॅलेक्सी म्हणजेच आकाशगंगा शोधली आहे, जी आपली पृथ्वी ज्या आकाशगंगेचा एक भाग आहे त्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेपेक्षा तब्बल ३२ पट मोठी आहे. संशोधकांनी या आकाशगंगेला ‘इंकाथॅझो’ किंवा ‘ट्रबल’ अशी टोपण नावे दिली आहेत. अशी नावे देण्याचे कारण म्हणजे या आकाशगंगेची भौतिक रचना समजून घेण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

२०२० पर्यंत संशोधकांनी ८०० महाकाय रेडिओ आकाशगंगा शोधलेल्या आहेत. सुमारे ५० वर्षांपूर्वी अशा आकाशगंगांचा सुरुवातीला शोध लावण्यात आला होता. त्यावेळेपासून शोधलेल्या अशा शेकडो आकाशगंगा अभ्यासाचा विषय बनलेल्या आहेत. या आकाशगंगा अतिशय दुर्मीळ असतात.

आता दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट यासारख्या नव्या जनरेशनच्या रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्याने नव्या रेडिओ आकाशगंगांचा शोध घेण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळातच सुमारे अकरा महाकाय आकाशगंगा शोधण्यात आल्या आहेत. ‘मीरकॅट’नेच ही नवी महाकाय रेडिओ गॅलेक्सी शोधली आहे. ती अतिशय असामान्य अशीच आहे. या आकाशगंगेतील प्लाझ्मा जेट एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत ३.३ दशलक्ष प्रकाशवर्षांचा आहे. ही आकाशगंगा ‘मिल्की वे’च्या आकारापेक्षा ३२ पट मोठी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR