29.8 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रमिसळीचा स्वाद घेत कट्ट्यावर रंगल्या गप्पा

मिसळीचा स्वाद घेत कट्ट्यावर रंगल्या गप्पा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे रिंगणात होते. मतदानानंतर तिन्ही उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर गप्पा मारायला येणार होते. मात्र मुरलीधर मोहोळ हे वाडेश्वर कट्ट्यावर पोहोचले नाहीत. रवींद्र धंगेकर, वसंत मोरे हे दोघेच वाडेश्वर कट्ट्यावर आले. वाडेश्वर कट्ट्यावर प्रचारादरम्यानच्या गमतीजमती ऐकायला मिळाल्या.

दरम्यान, पुण्यातील मतदानाआधीही तिन्ही उमेदवार एकत्र आले होते. तेव्हा तिघेही उपस्थित होते. मात्र यावेळी मुरलीधर मोहोळ हजर राहू शकले नाहीत. वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर यांनी आज वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र गप्पा मारल्या. यावेळी रवींद्र धंगेकरांनी वसंत मोरे यांना मिसळीचा घास भरवला.

पुण्यातील प्रसिद्ध अशा वाडेश्वर कट्ट्यावर एकाच टेबलवर या गप्पा रंगल्या. मतदानाच्या आधी जेव्हा गप्पा झाल्या तेव्हा पुण्यातील समस्यांवर चर्चा झाली होती. वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाण्याच्या समस्या यावर चर्चा करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR