मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मी टू प्रकरणी कोर्टाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. अभिनेत्रीवरील लैंगिक छळाच्या आरोपाखाली पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पुरेशा पुराव्याअभावी नाना पाटेकर दोषी ठरण्यापासून वाचले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने पाटेकरांविरोधात तक्रार दाखल केली होती तर तिने त्यांच्यावर गंभीर आरोप करत अंधेरी कोर्टात याचिकाही दाखल केली होती. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर एका फिल्मच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप लावला होता. या प्रकरणी तिने नाना पाटकरांसह इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी कोर्टात विनयभंग आणि धमकीची तक्रार दाखल केली होती आणि याचिकाही दाखल केली. यावर न्याय दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अॅड. अनिकेत निकम यांनी पाटेकरांची बाजू मांडली. तसेच पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने दाखल केलेली याचिका फेटाळली तर मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट देखील फेटाळल्याने पाटेकरांना दिलासा मिळाला आहे.