21.9 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeमुंबईचा ‘किंग’ कोण, ३६ मतदारसंघात अटीतटीची लढत

मुंबईचा ‘किंग’ कोण, ३६ मतदारसंघात अटीतटीची लढत

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील माहीम, वरळी, वांद्रे (पूर्व), मानखुर्द, शिवडी या मतदारसंघातील लढती सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत.
मुंबईतील बहुतांश मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ४२० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाचे २२, काँग्रेस ११ आणि शरद पवार गट २ तसेच एका जागेवर समाजवादी पार्टीने उमेदवार दिला आहे. तर महायुतीकडून भाजप १८, शिंदे गट १६ आणि अजित पवार गट २ जागांवर उमेदवार रिंगणात आहे.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत २५ उमेदवार दिले आहेत. यामुळे मराठी मतदारांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. मनसेच्या उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचे आव्हान वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी सर्वाधिक जागा महायुती जिंकेल, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे; तर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप सत्ता मिळवण्याच्या हव्यासापोटी आपल्या मित्रपक्षांना कमकुवत करते. मात्र माझ्या पक्षाने मित्रपक्षांना बळ दिले आहे, असे अनिल परब यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR