23.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत पुन्हा हिट अँड रन; कारने दोघांना धडक, एकाचा मृत्यू

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; कारने दोघांना धडक, एकाचा मृत्यू

मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. ठिकठिकाणी भाविक आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी करत असतानाच मुलुंडमध्ये हिट अँड रनची मोठी दुर्घटना घडली आहे. मुलुंडमध्ये दोघेजण रस्त्यावर गणपतीचे बॅनर लावत होते. तेवढ्यात एका बीएमडब्ल्यू कारने दोघांना जोरदार धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुस-याची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे चारच्या सुमारास अपघाताची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चारच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते. याचवेळी अचानक भरधाव वेगातील एका बीएमडब्ल्यू कारने कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून, प्रसाद पाटील याची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मालाडमध्ये एका आलिशान कारच्या धडकेत निष्पाप महिलेचा बळी गेल्याची घटना घडली होती. यापूर्वी वरळी हिट अँड रन अपघातामुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातील एका नेत्याच्या मुलाने आपल्या महागड्या कारने एका महिलेला फरफटत नेले होते, यामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज गणेश चतुर्थीच्या दिवशीच मुलुंडमधून हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR