33.6 C
Latur
Tuesday, February 18, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईत प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

मुंबईत प्रेमीयुगुलाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे एका प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेत आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला आहे. आत्महत्या करणा-या मुलाचे वय १९ तर मुलीचे वय अवघे १५ वर्षे आहे. दोघांनी अशाप्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय मुलगा आणि १५ वर्षांची मुलगी, याचं एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही लग्न करून संसार थाटायचा होता. पण घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. शिवाय मुलगीही अल्पवयीन होती.

घरातून होणारा विरोध पाहता, दोघांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात एका एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR