मुंबई आंदोलन निर्णायक; कुणबी प्रमाणपत्राच्या आदेशाशिवाय माघार नाही

लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आजवर झालेल्या आंदोलनांदरम्यान शासनाने वेळकाढूपणाची भूमिका घेतली. मात्र, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणारे संभाव्य आंदोलन ही निर्णायक लढाई असून, त्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार रविवारी (दि.१३) लातूर येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. कुणबी प्रमाणपत्राबाबत निर्णायक शासन आदेश निघाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.

मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवास, वाहन व्यवस्था, समाजबांधवांची संख्या व इतर तयारीबाबत बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यातून किमान २०० वाहने १५ सप्टेंबरपासून मुंबईकडे रवाना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील समाजबांधव जरांगे यांच्यासोबत जाण्यासाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्काम करणार आहेत. गावागावांतून नियोजन करण्यात येत असून जिल्ह्यासाठी एकसमान बॅनर, पुरेसा शिधा व स्वयंपाकाची व्यवस्था केली जाणार आहे. महिलाही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत.

शेतीतील नापिकी, कर्जबाजारीपणा, मुलांचे शिक्षण व मुलींच्या विवाहाचा खर्च यामुळे समाज अडचणीत आहे. सन्मानाने जगण्यासाठी आरक्षण हाच समर्थ पर्याय असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. हैदराबाद गॅझेटची ंमलबजावणी करावी तसेच कुणबी प्रमाणपत्रासाठी कोल्हापूर, औंध, सातारा आदी गॅझेटिअरही तातडीने लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली. कुणबी प्रमाणपत्राबाबत अधिकृत शासन आदेश मिळाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:28
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20

Latest news