32.5 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई-आग्रा हायवेवर भीषण अपघात

मुंबई-आग्रा हायवेवर भीषण अपघात

मालवाहू ट्रक रिक्षावर आपटला; रिक्षातील ४-५ जणांचा मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी
मालेगावजवळ दरेगाव येथे मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला. मालवाहू ट्रक विरुद्ध बाजूने जात असताना अचानक उलटला. ट्रक थेट प्रवासी रिक्षावर पडला, त्यामुळे रिक्षा पूर्णपणे चिरडली गेली. या दुर्घटनेत रिक्षातील ४ ते ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ट्रक हटवण्याचे काम सुरू आहे. मृतांचा अधिकृत आकडा आणि जखमींची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

अपघातात चार ते पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारा मालवाहू ट्रक अचानक विरुद्ध बाजूने आला आणि नियंत्रण सुटल्याने पलटी झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR