29.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई, विदर्भात तापमानात वाढ

मुंबई, विदर्भात तापमानात वाढ

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील तापमान ४ ते ५ अंशांनी वाढले आहे. राज्यातील काही भागांत तापमानात वाढ सुरूच राहणार आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी प्रचंड उन्हाच्या झळा अनेक भागात जाणवत आहेत. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ४० वर पोहोचले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी होत आहेत.

गेल्या २४ तासांत तापमानात मोठा बदल झाला आहे. मुंबई आणि विदर्भातील तापमानामध्ये ४ ते ५ अंशांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा ३५.८ अंश सेल्सियसवर होता. तर ठाण्यात ३६.६ अंश तापमानाची नोंद झाली. सांगलीत ३७.१ अंश सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या ३ ते ४ दिवसांत तापमान वाढतच राहणार असून उष्णतेची लाट तीव्र होणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात तापमानाची सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे. या भागात उन्हाचे चटके वाढले आहेत. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ३७.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतही वाढत्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

अमरावतीमध्ये ३६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्याचा पारा ३७ अंशावर नोंद करण्यात आला आहे. मुंबईतही दिवसा ३५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत तापमान वाढले तरी गारवा कायम आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR