24.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी साधला गडचिरोलीतील ‘लाडक्या बहिणींशी’ संवाद

मुख्यमंत्र्यांनी साधला गडचिरोलीतील ‘लाडक्या बहिणींशी’ संवाद

गडचिरोली : प्रतिनिधी
गडचिरोलीच्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ पोहोचला. शासकीय योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन व प्रशासन मनापासून काम करत असल्याची ही फलश्रुती असून याचा मला आनंद आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना प्रभावीपणे राबवित असल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक आणि अभिनंदन केले. शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ व ‘मुख्यमंत्री युवा कार्य योजने’च्या लाभार्थींशी मुख्यमंत्री यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

दरम्यान, सोनाली गेडाम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधताना ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ काढल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांना धन्यवाद दिले व राज्याची प्रथम लाभार्थी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. प्रशिक्षणार्थी अनुभवाचा लाभ नोकरीसाठी आणि विद्यावेतनाचा लाभ पुढील शिक्षणासाठी होईल, असेही त्यांनी सांगितले.

गडचिरोलीतून जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची राज्यातील पहिली लाभार्थी सोनाली गेडाम यांनी मुख्यमंत्र्यांकडे मनोगत व्यक्त केले. कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, शिक्षणाधिकारी बी.एस. पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू याप्रसंगी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR