परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू तालूक्यात आज झालेल्या सतंतधार पावसामूळे मोरेगाव वालूर रस्त्यावरील साळेगाव खडकी परिसरातून वाहणा-या नाल्याला मोठा पूर आला. या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मंगळवार, दि.१६ जुलै रोजी पावसाने हजेरी लावली.
सेलू तालुक्यात देखील दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मोरेगाव- वालूर रस्त्यावरील साळेगाव खडकी परीसरातून जाणा-या नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी या नाल्यावरून वात असल्याने मोरेगाव वालूर रस्ता दोन तासापासून बंद पडला होता. या नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने साळेगाव येथील शेतक-यांच्या हळद, सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान या पावसाने सर्वत्र हजेरी लावली असल्याने समाधान व्यक्त होत आहे.