मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना फूड पॉइझनिंगचा त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना कुर्ला येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवर बा रुग्ण विभागात (ओपीडी) उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी भाभा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांची प्रकृती व सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
















