22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रम्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, अन्यथा बिल्डरांना दंड लावा

म्हाडाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा, अन्यथा बिल्डरांना दंड लावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : प्रतिनिधी
म्हाडाने वेळेत गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून घ्यायला हवेत, अन्यथा प्रकल्प रेंगाळून पुन्हा त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ येते. जे बिल्डर्स वेळेत प्रकल्प पूर्ण करतील, त्यांना बक्षीस द्यावे आणि जे मर्यादित वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्या बिल्डरला दंड लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोकण म्हाडाच्या लॉटरी समारंभात दिले.

कोकण म्हाडाच्या ५३११ घरांची लॉटरी आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या समारंभात काढण्यात आली. त्यावेळी विजेत्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी गृह प्रकल्पांना होणा-या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली.

गुणवत्तापूर्ण घरे वेळेत पूर्ण करण्याची गरज व्यक्त करीत शेवटच्या घटकापर्यंत फायदा पोहोचण्यासाठी नियम सूट करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी देऊन म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणा-या ३० हजार लोकांना घरे देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले. यावेळी गृहनिर्माण मंत्री अनिल सावे, संजीव जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR