21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रयश येणार नसल्याची खात्री झाल्याने हिंदू-मुस्लिमचे राजकारण

यश येणार नसल्याची खात्री झाल्याने हिंदू-मुस्लिमचे राजकारण

‘व्होट जिहाद’वरून शरद पवारांनी फडणवीसांना सुनावले खडेबोल

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. त्यातच यंदाच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’ होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला गेला आहे. त्यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. भाष्य करताना शरद पवारांनी फडणवीसांना सुनावले आहे.

शरद पवारांनी फडणवीसांवर बोलताना, ‘जिहाद’ हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघांत मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केले. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केले तर आम्हाला सवय आहे. असेच होते. पण याचा अर्थ जिहाद होतो असे नाही. फडणवीस यांनी जिहाद शब्द वापरला. फडणवीस आणि त्यांच्या सहका-यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण ते खराब करत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
पुढे बोलताना शरद पवारांनी ‘मी अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली.

निवडणुकीच्या काळात. मी कॉलेजात शिकत असताना नेहरूंचे भाषण पुण्यात ऐकले. त्यानंतर सर्व पंतप्रधानांची भाषणे ऐकली. साधारण उद्याचा विकास कसा असेल. काय कार्यक्रम असेल हे मांडतात. पहिले पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी सुरुवातच केली ‘४०० पार’ची. ‘४०० पार’ कशासाठी?,अशा शब्दांत टीका केली.
तसेच नरसिंह राव पंतप्रधान होते. आमची मेजॉरिटी नव्हती. त्यांना बहुमत नव्हते. तरीही सरकार चालवले. सरकार चालते. तरीही मोदी ‘४०० पार’ मागत होते. याचा अर्थ त्यांचे सहकारी घटनाबदलाचे बोलत होते. संविधानात दुरुस्तीबद्दल बोलत होते. त्यामुळे आम्हाला लोकांना सांगावे लागले की सरकार काय करणार आहे. आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.

निकालानंतर बघू किती जागा येतील
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळतेय. अशातच कोणत्या आघाडीला आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत तर्क लावले जात आहेत. याचबाबत शरद पवारांना विचारण्यात आले. तेव्हा मी काही ज्योतिषी नाही. निकालानंतर बघू किती जागा येतील, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का? यावरही मी काही ज्योतिषी नाही, असे पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR