29.1 C
Latur
Tuesday, June 10, 2025
Homeअंतरराष्ट्रीययुक्रेनसह पाश्चात्य देशांवर ‘वॉरहेड अटॅक’ची धमकी;  पुतीनच्या इशा-याने अमेरिका, ‘नाटो’ चिंतेत

युक्रेनसह पाश्चात्य देशांवर ‘वॉरहेड अटॅक’ची धमकी;  पुतीनच्या इशा-याने अमेरिका, ‘नाटो’ चिंतेत

मॉस्को : वृत्तसंस्था
युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचे अनेक लढाऊ विमाने नष्ट झाली. आता या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही युक्रेनला अशा वॉरहेड्सने प्रत्युत्तर देऊ, ज्याची उष्णता सूर्याच्या तापमानासारखी असेल, असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला. यावरुनच आता पुतिन आरपारच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला तीक्ष्ण इशारा दिला, रशिया आता टार्गेट निवडत आहे, हे टार्गेट युक्रेनच्याही पलीकडे असू शकतात. झेलेन्स्की आणि त्यांच्या पाश्चात्य मालकांना पश्चाताप करावा लागेल. आम्ही खूप सहन केले, आता रशिया गप्प बसणार नाही. त्यांच्या विधानाला पाश्चात्य मित्र राष्ट्रांसाठी, विशेषत: अमेरिका आणि नाटोसाठी थेट धोका मानले जात आहे. पुतिन यांनी ऑरसोनिक वॉरहेड्सने हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विधानावरून स्पष्ट होते की, रशिया केवळ युक्रेनपुरता मर्यादित राहणार नाही. गरज पडल्यास ते पाश्चात्य देशांवर, विशेषत: अमेरिका आणि नाटोवर देखील हल्ला करू शकतात. नाटो आणि अमेरिका युक्रेनला मदत करत असून, त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या मदतीनेच युक्रेन रशियन सीमेत हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.

तिस-या महायुद्धाचा धोका वाढला
पुतिन यांच्या दाव्यानुसार, रशियाकडे असे ओरेसोनिक वॉरहेड्स आहेत, जे प्रति सेकंद ३ किलोमीटर वेगाने उडतात आणि लक्ष्यावर कोसळताना ४००० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढते. हे सूर्याच्या तापमानाइतकेच आहे. हे मोठा विनाश आणि विध्वंस घडवून आणू शकतात. पुतिन यांनी युक्रेनवर अण्वस्त्रांनी हल्ला केला, तर ते जगाला तिस-या महायुद्धातही ढकलू शकते. पुतिन यांच्या विधानानंतर अमेरिका, ब्रिटन आणि नाटो खूप चिंतेत पडले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR