अलिगढ : उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील न्यायालयाने एका सामूहिक बलात्कार प्रकरणी निकाल दिला आहे. चालत्या ऑटोमध्ये सामूहिक बलात्कार करणा-या युसूफ आणि आझाद या दोन गुन्हेगारांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच १.२५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
सूत्रांच्या मते, १५ एप्रिल २०२२ रोजी नोएडाहून परतत असताना पीडित महिलेने बस स्टँडवरून ऑटो पकडला होता. यानंतर तीन आरोपींनी ऑटोमधील महिलेला लुटून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी अल्पवयीन आहे, त्याच्यावर दुस-या न्यायालयात खटला सुरू आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू राजपूत जलदगती न्यायालय क्रमांक १ यांनी ही शिक्षा सुनावली.