18.6 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeअंतरराष्ट्रीययेमेनला जाणारे तेलवाहू जहाज समुद्रात बुडाले

येमेनला जाणारे तेलवाहू जहाज समुद्रात बुडाले

१६ पैकी १३ जण भारतीय असल्याची माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ओमानमधून येमेनच्या दिशेने जाणारे तेलवाहू जहाज बुडाल्याची माहिती मिळत आहे. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने यासंदर्भात माहिती दिली. या तेलाच्या टँकरचे नाव प्रेस्टीज फाल्कन असल्याचे सांगितले जात आहे. तेलवाहू जहाजावर तब्बल १६ क्रू मेंबर्स असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या १६ जणांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. १६ पैकी १३ जण भारतीय असल्याचे समोर येत आहे. तसेच तीन जण श्रीलंकेचे नागरिक आहेत.

ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्सना घेऊन जाणारे एक तेलवाहू जहाज ओमानच्या किना-याजवळ बुडाले. या जहाजातील क्रू मेंबर्स बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच बचावकार्यही सुरू करण्यात आले. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार तेलवाहू जहाज पाण्यात बुडाले असून पलटी झाले होते. ते पुन्हा स्थिर झाले की नाही? जहाज बुडाल्यानंतर समुद्रात त्यातून तेल गळती झाली आहे की नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. हे जहाज २००७ मध्ये बांधलेले ११७ मीटर लांबीचे तेल उत्पादन टँकर आहे. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR