28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरयोगसमाधीस स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मेघडंबरीस तिरंगा ध्वजाच्या रंगाच्या फुलांनी सजावट

योगसमाधीस स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मेघडंबरीस तिरंगा ध्वजाच्या रंगाच्या फुलांनी सजावट

सोलापूर—ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्देश्वर महाराजांच्यामंदिरात पवित्र श्रवण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी योगसमाधीस स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मेघडंबरीस तिरंगा ध्वजाच्या रंगाच्या फुलांनी सजावट केली होती. दर्शनासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह जिल्ह्यातील हजारो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. ग्रामीण भागातील भजनी मंडळाने दिवसभर श्री सिध्देश्वर चरणी भजन सादर करुन सेवा अर्पण केली.

भारत तेलसंग व त्यांच्या सहकारी टीमने अखंड १५ तासांच्या परिश्रमाने मेघडंबरीची सजावट केली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा ध्वज साकारला आहे.यात पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, जांभळी शेवंती, निशिगंध, पिवळा झेंडू, लाल झेंडू, अष्टर, पांढरा फोम, लोखंडी अँगल या सर्वांच्या माध्यमातून ही सजावट साकारली आहे. त्यासाठी १२०० किलो फुलांचा वापर केला आहे. ‘ओम नमः शिवाय’, ‘ओम’, आणि ‘श्री सिद्धरामेश्वर’ यांचे स्टिकर लावले आहे.

महादेवाच्या पिंडीला बेलपत्र हे प्रिय आहे. भाविकांनी श्री सिध्देश्वर मंदिरातील श्री सिध्देश्वर स्थापित ६८ शिवलिंगांना बेलपत्र अर्पण करुन दर्शन घेतले. शहराच्या पंचक्रोशीत असलेल्या शिवलिंगांना सुमारे १७ किलोमीटर अंतराची परिक्रमा करुन बेलपत्र अर्पण करुन दर्शन घेतले. श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात बोललेला नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होती. नवस फेडण्यासाठी भाविक ओल्या अंगाने दंडवत घालत होते. हातात कड़वा घेऊन भाविक बोललेला नवस पूर्ण करतात, असे शिवशंकर हब्बू यांनी सांगितले.

श्री सिध्देश्वर देवस्थानच्यावतीने दासोहात सोमवारी सुमारे ३० हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रावणानिमित सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दासोह सुरू होते. कड़क भाकरी, लापशी, आमटी, चपाती, भात, असा महाप्रसाद होता. ग्रामीण भागातील भाविकांनी श्री सिध्देश्वर मंदिर परिसरात भाकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या भिक्षुकांना पिठलं-भाकरी महाप्रसाद वाटप केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR