तीन सख्ख्या भावांना खूनप्रकरणी जन्मठेप

माळशिरस : राहत्या घराच्या जागेच्या वादातून फोंडशिरस (ता. माळशिरस) येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन आरोपींना माळशिरस जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. डी. हुली यांनी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जन्मठेपेची शिक्षा झालेले तीन सख्खे भाऊ आहेत.

किसन महादेव वाघमोडे(२२), धर्मेंद्र महादेव वाघमोडे(२८) व अंकुश महादेव वाघमोडे (वय ३५, सर्व रा. फोंडशिरस, ता. माळशिरस) अशी शिक्षा झालेल्या तीन सख्ख्या भावांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद मयताचा मुलगा बापू वाघमोडे यांनी नातेपुते पोलिस ठाण्यात दिली होती. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या शेजारी गट नं १४१३ राहण्यास आहेत. त्यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता. फिर्यादीचे घर हे आरोपींच्या शेतात येत असल्याने व फिर्यादीची जनावरे आरोपी आमच्या जागेत बांधायची नाहीत, असे सांगत असल्याने फिर्यादी व आरोपी यांच्यात नेहमी वाद होत होता.

१९ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी साडेचार वाजता फिर्यादी व आरोपी यांच्यात घर व जनावरे बांधण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाच्या वेळी आरोपी किसन वाघमोडे यांनी लोखंडी पाइपने फिर्यादीचे वडील नाना अण्णा वाघमोडे(७०) यांच्या डोक्यात मारहाण केली. तर धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात जबरी मार बसल्याने नाना वाघमोडे यांच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना नातेपुते येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले व तेथून अकलूज येथे दाखल केले असता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत मयताचा मुलगा बापू वाघमोडे यांनी तीन आरोपींच्या विरोधात नातेपुते पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या घटनेचा तपास नातेपुते पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी केला. तपास करून वरील तीन आरोपींच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात इतर साक्षीदार तपासण्यात आले आहेत. यात मयताच्या नातवाची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलिसांनी दाखल केलेले पुरावे व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्रा धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुली यांनी किरण वाघमोडे, धर्मेंद्र वाघमोडे व अंकुश वाघमोडे या तिघांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. संग्राम पाटील व अ‍ॅड. सूर्यकांत ढवळे यांनी काम पाहले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news