16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रयोजना काय देता, कांद्याला भाव द्या

योजना काय देता, कांद्याला भाव द्या

लाडकी बहीण योजनेवर बच्चू कडूंचा प्रहार

अमरावती : प्रतिनिधी
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला जात आहे. यावर आता महायुतीला घरचा आहेर मिळाला आहे. आम्हाला योजना काय देता आमच्या कांद्याला भाव द्या, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शेतक-यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. बच्चू कडू म्हणाले की, आमच्याकडे कांदा असल्यावर हस्तक्षेप करत नाही. शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार, आमदार बोलत नाहीत. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो.

आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार, तुम्ही आम्हाला रडविले, आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत. काँग्रेस व भाजपने निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था उखडून फेकणार आहोत. तुम्ही काय आम्हाला योजना देतात, आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला ४ क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना १५ क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR