मुंबई : प्रतिनिधी
अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. परिसरातील सेकंड क्रॉस लेन परिसरात ही आग लागली आहे. सकाळी ९.३० च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आगीमध्ये दोन बंगले जळून खाक झाले आहेत.
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील पॉश परिसरात असलेल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी (१९ सप्टेंबर) सकाळी भीषण आग लागली. कॉम्प्लेक्सच्या ग्राऊंड प्लस एक मजल्यावरील बंगल्याला आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आग लागण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.