32.7 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeलातूररयतू भाजी, फ्रूट मार्केट असोसिएशने माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची घेतली भेट

रयतू भाजी, फ्रूट मार्केट असोसिएशने माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील लातूर रयतु भाजी फ्रुट मार्केट असोशियशनसह लातूर शहरातील गंजगोलाई, उषाकिरण चित्रमंदिर, क्रीडा संकुल व इतर चौकातील गाड्यावरून फळ इतर वस्तू विकणा-या विक्रेत्यांनी रवीवार दि. २ फेब्रूवारी रोजी बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन व्यवसायासाठी कायमस्वरुपी जागा मिळत नाही तो पर्यंत पर्यांयी तात्पुरती जागा उपलब्ध करुन दयावी, अशी मागणी केली. यावर मनपाने अतिक्रमण म्हणून हटवलेल्या सर्व फेरीवाल्यांना शहरातील वेगवगळया भागात तात्पुरती जागा उपलब्ध करुन द्यावी अशा सुचना मनपा प्रशासनाला केल्या आहेत.
बाभळगाव निवासस्थानी रवीवार दि. २ फेब्रूवारी रोजी सकाळी लातूर रयतु भाजी व फ्रुट मार्केट असोशियशनसह लातूर शहरातील गाड्यावरून फळ इतर वस्तू विकणा-या विक्रेत्यांनी राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना निवेदन देऊन कायमस्वरुपी जागा मिळे पर्यंत तात्पुरती पर्यायी जागा शहरात उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली.
या शिष्टमंडळा सोबत आमदार देशमुख यांनी सर्वांचे म्हणणे ऐकूण घेतले, सोबत सविस्तर चर्चा केली. यानंतर या फळ व भाजीपाला विर्केत्यांकडे मनपाचा परवाना आहे, मनपाने त्यांच्या कायमस्वरुपी जागेची व्यवस्था करावी. तो पर्यंत त्यांना व्यवसाय करण्यासाठी तात्पुरतीशहरात जागेची व्यवस्था करावी असा सुचना मनपा प्रशासनाला त्यांनी योवळी केल्या. याप्रसंगी असंघटीत कामगार काँग्रेस लातूर शहराध्यक्ष गौस गोलदाज, मजीद बागवान, हमीद बागवान, रवीकांत सुर्यवंशी, राजेखां पठाण, सायरा पठाण, तम्मा स्वामी, पप्पू देशमुख, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, अयुब मणियार तर रयतु भाजी व फळ विक्रेते असोसिएशनचे बालाजी गिरी, गोविंद गिरी, अयुब पठाण, छाया शेवाळे, राम सांळुके, शकुतला पुरी, शकीला बागवान, प्रभावती ढोके आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR