17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रराजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात

राजू शेट्टी-मविआ मैत्रीची शक्यता संपुष्टात

ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने हातकणंगलेत चौरंगी लढत

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता बुधवारी संपुष्टात आली. कारण उद्धव ठाकरे गटाने तेथे सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. आता शिंदेसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, मविआचे सत्यजित पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचितचे डी. सी. पाटील अशी लढत तेथे होणार आहे.

शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्याचे अनेक प्रयत्न झाले पण दोन्ही बाजूंनी काही अटी, शर्ती होत्या, त्यावर चर्चाही झाली पण एकमत न झाल्याने शेवटी चौरंगी लढतीचे चित्र आता समोर आले आहे. शेट्टी यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. मविआने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा, अशी विनंती शेट्टी यांनी ठाकरेंना केली होती.

असे म्हटले जाते, की ते मविआचा घटक पक्ष यासाठी होऊ इच्छित नव्हते की काँग्रेस व शरद पवार गटासोबत गेल्यास मतदारसंघात त्याचा फटका बसेल, साखर कारखानदारांच्या सोबत गेल्याचा आरोप होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत गेल्याचा पूर्वी फटका बसला हा पूर्वानुभव त्यांच्या गाठीशी होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR