34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरराज्यपालांच्या हस्ते भातलवंडे यांना राष्ट्रपतिपदक प्रदान

राज्यपालांच्या हस्ते भातलवंडे यांना राष्ट्रपतिपदक प्रदान

लातूर : प्रतिनिधी
पोलीस उपअधीक्षक गजानन लक्ष्मीकांतराव भातलवंडे मुख्यालय, लातूर यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राज्यपाल श्री रमेश बैस यांचे शुभहस्ते दिनांक ६ जून रोजी दरबार हॉल राजभवन मुंबई येथे शानदार सोहळ्यात राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
गजानन भातलवंडे हे सन १९९३ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर नेमणूक झाल्यानंतर त्यांच्या सेवा कालावधीत भंडारा, गोंदिया या नक्षलग्रस्त भागासोबतच नांदेड, बीड, परभणी, लातूर या ठिकाणी सेवा बजावली आहे. गजानन भातलवंडे यांनी यापूर्वी लातूर पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. गजानन भातलवंडे यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल यापूर्वी विशेष सेवा पदक, आंतरिक सुरक्षा पदक तसेच माननीय पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह त्यांना प्रदान करण्यात आले आहे. आजपर्यंतच्या सेवा कालावधीत गजानन भातलवंडे यांना ६५० बक्षिसे आणि ५१ प्रशंसापत्र मिळालेली आहेत. गजानन भातलवंडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल  सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक लातूर, अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांनी तसेच लातूर पोलीस दलातर्फे व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR