18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरराज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कारासाठी प्रकाश घादगीने, रमेश माने यांची निवड

राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कारासाठी प्रकाश घादगीने, रमेश माने यांची निवड

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यावतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील प्रकाश घादगीने व रमेश माने यांची निवड झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रकाश घादगीने व रमेश माने हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते असून ते सध्या राज्यस्तरावर राज्य कार्यकारी सदस्य व प्रशिक्षण विभागावर काम करतात. लातूर जिल्ह्यातल्या व राज्यभरातल्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केलेले आहे.
 तसेच समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणा-या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाढीसाठी ही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांची या वर्षीच्या आधारस्तंभ पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. सदरील पुरस्कार दि. १४ व १५ सप्टेंबर रोजी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर जिल्हा रायगड येथे जेष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी संपादक विनोद शिरसाठ, पत्रकार अलोक देशपांडे, बालसाहित्यिक राजीव तांबे,े संपादक राजीव देशपांडे, संपादक राहुल थोरात, अ‍ॅड. मुक्ता दाभोळकर हे उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार लातूर जिल्ह्यातील या दोन धडाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR