मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असे असतानाच आता रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचे रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप आहेत. विरोधकांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असे असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नवी नियुक्ती करण्यात येणार आहे. तीन आयपीएस अधिका-यांचे पॅनल तयार केले जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. शुक्ला या भाजपला मदत करणा-या अधिकारी असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता. संजय राऊत यांनी देखील रश्मी शुक्ला यांच्या बदलीची वारंवार मागणी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.