22.1 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील महिला असुरक्षित

राज्यातील महिला असुरक्षित

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

पुुणे : प्रतिनिधी
पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, पुणे येथील स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलिस चौकी आहे.

तरीही अशी घटना घडल्याने या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. यावरून सुप्रिया सुळे यांनी पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ही घटना म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

बसस्थानकाला नीलम गो-हे यांची भेट
या प्रकरणी आता शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलिस चौकी आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

सुरक्षारक्षकांची संख्या वाढवा : काँग्रेस
बलात्काराची घटना ही निंदनीय आहे. पण एसटी डेपोमध्ये सुरक्षारक्षक वाढविण्याची गरज आहे. राज्यातील अनेक एसटी डेपोमध्ये सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. याची दखल एसटी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि एसटी डेपोमध्ये आलेल्या प्रत्येक बसची तपासणी ही केली पाहिजे. एसटी प्रशासनाने चांगली व्यवस्था उभी केली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR