राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक हत्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना प्रकाशझोतात आल्या. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळाल्या. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहणार आहात? असा सवाल काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला केला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या हत्या सत्रांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशामध्ये वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यामध्येही दोन बहिणींची हत्या करण्यात आली. तर, पुणे शहरात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. यामुळे विरोधकांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

यावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केले की, बदलापूर, आता कल्याण, पुणे! जाग येण्यासाठी सरकार आणखी किती घटनांची वाट बघत आहे? कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी विशाल गवळीवर यापूर्वीही अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना तो जामिनावर सुटला आणि पुन्हा एका लहान मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेतला. हे अत्यंत संतापजनक आहे. यावरून राज्यातील पोलीस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते, असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

बदलापूर असो किंवा कल्याण, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे? हे या घटनांमधून स्पष्ट होते. राजगुरुनगर, पुणे येथे दोन बहिणींची हत्या हादेखील संतापजनक प्रकार आहे. खेळता खेळता हरवलेल्या या मुलींच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे. गुन्हेगार निर्भयपणे वावरत असून हे सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी
घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. राज्यात महिला आणि मुली निर्भयपणे फिरू शकत नाही. इथे गुंड, बलात्कारी निर्धास्तपणे फिरत आहेत. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागेल. या दोन्ही घटनांतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्थेने ठोस पावले उचलावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणावर शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट बोलले; ‘सरकार निर्णय घेणारच नाही असं नाही’
11:32
Video thumbnail
Nanded|35 जणांना एकच जमीन विकली; नांदेड पोलिसांची मोठी कारवाई
02:55
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:52
Video thumbnail
Latur|गणरायाच्या आरतीने एकमत कार्यालय भक्तिमय | धनंजय देशमुख उपस्थित
02:21
Video thumbnail
Nanded|झेंडावंदनावरून नांदेडमध्ये वाद! पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
03:17
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये हेल्मेटचा दणका! 15 दिवसांत 12,561 जणांवर कारवाई
03:13
Video thumbnail
Latur|झाडात अवतरले गणराय! ‘ग्रीन लातूर’चा अनोखा गणेशोत्सव
03:29
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन
04:28
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये सोयाबीन पिकावर संकट!दुष्काळ जाहीर करा,शेतकऱ्यांची मागणी
01:53
Video thumbnail
Latur|जगायला बळ द्या, अन्यथा मारून टाका!” शिरूर अनंतपाळमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश
03:37
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
09:37
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36

Latest news