19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात गारठा

राज्यात गारठा

मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात तापमान शुन्याखाली गेले आहे. तर दुसरीकडे तमिळनाडू समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसात तापमानात चढउतार होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान घसरले होते. मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट झाली होती. विदर्भातही किमान तापमान १० अंशांपर्यंत गेले होते. येत्या पाच दिवसात राज्यात थंडीची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यानंतर तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला.

येत्या ३-४ दिवसांत राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कोरड्या वा-यांचे प्रवाह सक्रीय झाले आहेत. तर दुसरीकडे तापमानात होणा-या वाढीमुळे सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना नागरिक करताहेत. येत्या दोन दिवसात थंडीत काहीशी वाढ होणार असून त्यांनंतर हळूहळू तापमान वाढण्यास सुरुवात होणार आहे. विदर्भात येत्या ४८ तासांत फारसा बदल राहणार नसून त्यांनंतर विदर्भातही तापमान २-३ अंशांनी वाढणार आहे.

कमाल तापमानात वाढ
राज्यात केलं काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. एकीकडे किमान तापमान घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी कमाल तापमान वाढल्याने पहाटे गारठा, धुके तर दुपारी उन्हाचा चटका नागरिकांना सहन करावा लागतोय .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR