28.8 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ठिकठिकाणी पाऊस

राज्यात ठिकठिकाणी पाऊस

कापूस, तूर, हळद, कांद्यासह पालेभाज्यांचे मोठे नुकसान!

मुंबई : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला आहे. आजही दिवसभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कालपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात झाली आहे. सर्वांत प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागामध्ये पाऊस पडला आहे.

शुक्रवारी वादळी पावसाने पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावली. यामध्ये बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागामध्ये जोरदार पाऊस पडला आहे. आजही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावणार आहे. यामध्ये यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. आज एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR