28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनराज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती

राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती

मुंबई : पोर्नोग्राफी नेटवर्क संदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्या मुंबईतील राहत्या घरी छापा टाकला आहे. यासोबत राज कुंद्रा यांच्या मुंबईतील कार्यालयांवरही ईडीच्या अधिका-यांकडून धाडसत्र सुरू आहे.

राज कुंद्राला जून २०२१ मध्ये अश्लील व्हीडीओग्राफी संदर्भातील आरोपांवरून अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी व्हीडीओ संदर्भात राज कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता. दोन महिने कारागृहात राहिल्यानंतर राज कुंद्रा सप्टेंबर २०२१ पासून जामिनावर आहे.

पोलिसांच्या दाव्यानुसार, राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी पोर्नोग्राफी फिल्मच्या माध्यमातून प्रचंड कमाई करत होते. यात सर्व नियमांचा भंग केला जात होता. याप्रकरणी एका तरुणीने मुंबईच्या मालवणी पोलिस ठाण्यात या रॅकेट संदर्भात पहिल्यांदा ४ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR