34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंना धक्का!; मनसेचा उमेदवार अर्ज छाननीत बाद

राज ठाकरेंना धक्का!; मनसेचा उमेदवार अर्ज छाननीत बाद

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात स्वबळावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला आहे. कारण राज ठाकरे यांच्या महिला शिलेदाराचा अर्ज बाद झाला आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मैदानात असलेल्या प्रशंसा मनोज अंबेरे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून सुरू झालेल्या छाननीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर सर्व उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रशंसा मनोज अंबेरे यांचा अर्ज बाद झाला आहे. अंबेरे या अकोल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. त्यांना राज ठाकरेंनी संधी दिली होती.

विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवायची असेल, तर त्यासाठी वयाची किमान २५ वर्षे पूर्ण असावी लागतात. मात्र प्रशंसा अंबेरे यांचे वय २४ वर्षे आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातही वयाचा उल्लेख आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांनी त्यांची संधी हुकली आहे.

मनसेकडून कोण कोण रिंगणात
मनसेने एकूण १३५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. माहिममधून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे लढत आहेत. तर वरळी येथून संदीप देशपांडे मैदानात आहेत. याशिवाय विद्यमान आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, तृप्ती सावंत, किशोर शिंदे, साईनाथ बाबर, मयुरेश वांजळे, नयन कदम, गजानन राणे यासारखे प्रमुख उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR