रायगड : रायगडमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव डम्परने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. तळा-मांदाड रस्त्यावर अपघाताची ही घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.