21.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रराशन दुकानांवर धान्य आल्याची माहिती मिळणार फोनवर

राशन दुकानांवर धान्य आल्याची माहिती मिळणार फोनवर

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
आता रेशन दुकानांवर धान्य आल्याचा आणि दुकानावरून धान्य उचलल्याचा मेसेज लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार आहे. त्यासाठी रेशन दुकानात आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात या आदेशाच्या अंमलबजावणीची स्थिती ८० टक्के एवढी झाली आहे. रेशन दुकानावरून धान्य घेतल्यानंतर कार्डधारकांच्या मोबाइलवर किती धान्य मिळाले, याचा एसएमएस येतो. त्यामुळे रेशन कार्ड आणि मोबाइल क्रमांक लिंक करणे गरजेचे झाले आहे.

दरम्यान, रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. रेशन कार्डधारकांना आता आपला मोबाईलनंबर रेशन कार्डसोबत लिंक करावा लागणार आहे. फसवणूक टाळण्यासाठी हे करणे गरजेचे आहे. ब-याच वेळेस राशन येऊन वाटपही होते, मात्र नागरिकांना त्याबद्दल माहीत नसते आपले राशन दुकानदार दुस-याला विकतो आणि जास्त नफा कमवतो अशा अनेक घटना समोर आल्या होत्या.

तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन केंद्रावर जाऊन तिथे ऑफलाईन रेशनकार्डशी मोबाईलनंबर लिंक करू शकता. जो नंबर आधारकार्डशी लिंक आहे तोच नंबर तुम्हाला रेशन कार्डसाठी द्यायचा आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवूनच मोबाईल नंबर द्या. तुमचा मोबाईलनंबर लिंक झाल्यानंतर तुम्हाला त्याचा मेसेज येईल.

ऑनलाईन कसा जोडायचा?
सर्वप्रथम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या वेबसाइटवर जा, nfs.delhi.gov.in. या वेबसाईटवर क्लिक करा. वेबसाइटवर ‘सिटिझन्स कॉर्नर’ नावाचा विभाग असेल, तेथे जा आणि ‘मोबाईल नंबरची नोंदणी/बदला’ वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. तिथे तुम्ही मोबाईल नंबर आणि बाकी डिटेल्स भरा, टर्म अँड कंडिशन्स अपालय करा, सबमिट करा. तुम्हाला डळढ येईल तो ओटीपी भरा आणि त्यानंतर सबमिट करा. तुमचा मोबाईल नंबर लिंक होईल.काहीवेळा असे होते की, सर्व प्रोसेस करुनही नंबर रेशनकार्डशी लिंक होत नाही, अशा वेळी तुम्ही रेशनकार्ड कस्टमर केअर नंबर १९६७ वर कॉल करून संबंधित माहिती मिळवू शकता. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रेशनकार्डशी का लिंक करू शकत नाही हे तुम्हाला कस्टमर केअर नंबरवर सांगितले जाईल. याशिवाय, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पुन्हा रेशनकार्डशी कसा लिंक करू शकता आणि एसएमएसद्वारे तुमच्या मोबाईलवर सर्व अपडेट्स कसे मिळवू शकता हे देखील तुम्हाला सांगितले जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR